Tuesday, November 3, 2009

तुला मी काय म्हणू ....

फूल म्हणू ...की फूलाची पाकळी म्हणू....
जाई म्हणू...की जाईचा नाजुकपणा म्हणू.....
मोगरा म्हणू...की मोगारयाचा सुगंध म्हणू....
का जाऊ दे....फ़क्त माझी एक वेडी मैत्रिण म्हणू ......

तुला मी काय म्हणू ....

तुला चंद्र म्हणू....की चंद्राची कोर म्हणू......
तुला चांदणे म्हणू ...की त्याची शीतलता म्हणू....
तुला सूर्य म्हणू...की सुर्याचा प्रकाश म्हणू....
का जाऊ दे....फ़क्त माझी एक वेडी मैत्रिण म्हणू ......

तुला मी काय म्हणू ....

दूध म्हणू की ...दुधाची साय म्हणू ....
मध् म्हणू...की मधाचा गोडवा म्हणू....
लिंबू म्हणू...की लिंबाचा आंबटपणा म्हणू ...
का जाऊ दे....फ़क्त माझी एक वेडी मैत्रिण म्हणू ......

तुला मी काय म्हणू ....

तुला समई म्हणू....की समईचा मंद प्रकाश म्हणू.......
तुला देवाचे फूल म्हणू...की त्याचे पावित्र्य म्हणू.....
तुला गाभारा म्हणू.....की त्याचे मांगल्य म्हणू........
का जाऊ दे....फ़क्त माझी एक वेडी मैत्रिण म्हणू ......

तुला मी काय म्हणू ....

तुला मूल म्हणू...की त्याची निरागसता म्हणू....
तुला बाळाचे हसू म्हणू.....की त्याचा गोडवा म्हणू......
त्याचे पाहिले बोल म्हणू...की तसा तुझा पहिला फ़ोन म्हणू......
का जाऊ दे....फ़क्त माझी एक वेडी मैत्रिण म्हणू ......

तुला मी काय म्हणू ....

तुला सागर म्हणू...की त्याची अथांगता म्हणू....
तुला नदी म्हणू...की तिचा चंचलपणा म्हणू...
तुला झरा म्हणू ..की त्याची सुंदरता म्हणू.....
का जाऊ दे....फ़क्त माझी एक वेडी मैत्रिण म्हणू ......

तुला मी काय म्हणू ....

तू किनारयाच्या वाळूसारखी आहेस.....वाटले की माझ्या हातात आहेस...पण जेंव्हा....मैत्री घट्ट करायला गेलो तर निसटून गेलीस.....अगदी सहज....अलगद...

Wednesday, June 24, 2009

आला श्रावण श्रावण ......

आला श्रावण श्रावण ...... बसुनी पक्ष्यांच्या पंखावर ...जणू फिरे सर्व नभी ...
आकाशाला लावी वेड...करे धरतीला आपली ....

आला श्रावण श्रावण ...... कासावीस सारे जीव ...आता होतील शांत तृप्त ...
जशी भुकेल्या पिलांना ... माय भरवी घास गोड .....

आला श्रावण श्रावण ...... कणात.. कणात... आता आला नवा जीव्....
घेती जन्म नवा ... जणू .... नवे एवलाले रो़प.......

आला श्रावण श्रावण ...... झाले रस्ते ओले चिंब .....चिम्ब ओल्या रस्त्यात....
माझ्या छोट्या डबक्यात ..साचे सारे आकाश आकाश........

आला श्रावण श्रावण ...... थेंब थेंब साचवूनी ...देई माती आपला सुगंध.....
आईच्या पोटच्या जणू ....बाळाचे ते हास्य ....

आला श्रावण श्रावण ...... येई बहर फुला पाकळी .....वाटे बघताना तो .....
लाजे हसतात .... नवप्रेमाने तरुणी.....

आला श्रावण श्रावण ...... उन झाले आता थोड़े.....देती ढग सावली सावली ......
रणरणत्या जीवनी माझ्या.....येई वडलांच्या स्मृती.......

आला श्रावण श्रावण ...... चाले खेळ उन पावसाचा....येती.... सात रंगच.. रंगात ....
इन्द्रधनुच्या रुपाने......देव घाली तोरण अंगणात......

आला श्रावण श्रावण ...... आले सणाचे दिवस....
शालू हिरवा नेसुनी...झाडे उभी अंगणात.....

आला श्रावण श्रावण ...... येतो घेउनी सरी पहिल्या.. पहिल्या पावसाच्या बाई.... माझ्या आठवणी प्रेमाच्या....
ते नसे पावसातले प्रेम...ते नसे पावसातले प्रेम.......मी न्हाते...प्रेमाच्या पावसात.....

आला श्रावण श्रावण ...... दूर राहिली सजणी...येई आठवण आठवण......
धाडीतो मी तुझ्या संग.....माझा निरोप निरोप......
विसरलो नाही मी..तुझ्या प्रेमाच्या सरी ग.....

आला श्रावण श्रावण ...... तुझ्या माझ्यातल्या पहिल्या ....राहिल्या सरींच्या आठवणी........
भर पावसात भिजतो.....माझ्या आस आसवांनी.............

आला श्रावण श्रावण ......